इमरान हाशमी हॉरर चित्रपट गाजणार

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Rooh movie तब्बल ५ वर्षांनंतर अभिनेता इमरान हाशमी पुन्हा एकदा हॉरर चित्रपटात झळकणार आहे. रुह या हॉरर चित्रपटाचा पहीला लूक प्रसिद्ध झाला असून यात इमरान सैतानाच्या भूमिकेत दिसणार आहे. यामुळे इमरानच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
 

Rooh movie  
दरम्यान, इमरानने याआधीही रोमॅंटीक बरोबरच हॉरर चित्रपटातही काम केलेले आहे. एक थी डायन ते डिबुक यांसारख्या चित्रपटात इमरान झळकला होता. यातील त्याचे काम पाहून सगळेच अवाक् झाले होते. आता तब्बल ५ वर्षांनंतर इमरान पुन्हा एकदा रुह या हॉरर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील इमरानचा लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. मेकर्सने सोशल मीडियावर इमरानच्या रुहचा अनाऊंसमेंट व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात इमरान भयंकर दिसत आहे.५२ सेकंदाच्या या अनाऊसमेंट Rooh movie क्लिपमध्ये जंगल दाखवण्यात आले असून यात हवेत अधांतरीत एक रहस्यमय मुलगीही तरंगताना दिसत आहे. त्यानंतर धुक्याने माखलेला आरसा दाखवला आहे . एक हात अचानक तो आरसा साफ करताना दिसतो. त्यानंतर त्या आरशात इमरानचा चेहरा दिसतो ज्यात त्याचे डोळे पूर्णत काळे दाखवले आहेत. नंतर चित्रपटाचे टायटल रुह दिसते.हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ,तेलगू,या भाषांमध्ये पाहता येणार आहे. मयंक शर्मा हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून विशाल कपूर आणि मयंक शर्मा यांनी याचे लेखन केले आहे. तर विक्रम खाखकर आणि सनी खन्ना हे निर्माते आहेत.