तभा वृत्तसेवा
आर्णी,
farmer-dies : पेरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेतात लोंबकळत असलेल्या बोअरवेलच्या सर्व्हिस केबला स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील लोणी शिवारात बुधवार, 24 जून रोजी सकाळी 10 च्या सुमारास घडली. सुभाष भाऊराव धोटे (वय55) असे मृतक शेतकèयाचे नाव आहे.
शेतकरी सुभाष धोटे हे शेतात पेरणी करण्यासाठी सकाळी शेतात गेला. तेव्हा शेतातील बोअरवेलचा लोंबकळत असलेला सर्व्हिस केबल (वायर) उंचावर लाकडाला बांधण्यासाठी त्यांनी हातात पकडला. तेव्हा त्यामधील जिवंत वीज प्रवाहाच्या धक्क्याने शेतकरी सुभाष धोटे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यामागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि मोठा परिवार आहे.