गोंदिया
ganja smugglers रेल्वे गाडीच्या माध्यमातून अमली पदार्थ्यांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलच्या वतीने ऑपरेशन नार्कोस अभियान राबविला जात आहे. दरम्यान २१ जून रोजी आरपीएफच्या विशेष पथकाने पूर्णा-गांधीधाम एक्सप्रेसमध्ये गांजा तस्करी करणार्या दोन आंतरराज्यीय तस्करांना अटक केले. दरम्यान त्यांच्याकडून ४२ लाख ८६ हजार रुपये किमतीचा ८५.७२० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. नरहरी बेहरा, कांती चंदन डोरा दोन्ही रा. कान्समारी, जिल्हा गंजम (ओडिसा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
ganja smugglers रेल्वे मार्गाद्वारे होणारी प्रतिबंधित औषधे, दारू, तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर अवैध पदार्थांची तस्करी प्रभावीपणे रोखण्यासाठी दपूम रेल्वेचे मंडळ सुरक्षा आयुक्त चेतन दिलीपराव जिचकार यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे संरक्षण दल, राज्य पोलिस दलांतर्गत ‘ऑपरेशन नार्कोस’ अभियान राबविला जात आहे. दरम्यान पुर्णा-गांधीधाम रेल्वे गाडी स्थानकावर येताच रेल्वे गाडीच्या बी-४ डब्यातून चार ट्रॉली बॅग आणि दोन लहान बॅगांसह दोन व्यक्ती संशयास्पद अवस्थेत आरपीएफ विशेष पथकाला आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी नरहरी बेहरा व कांती चंदन डोरा दोन्ही रा. कान्समारी, जिल्हा गंजम (ओडिसा) असे नाव सांगितले. तसेच बॅगची चौकशी केली असता, ४२ लाख ८६ हजार रुपये किमतीचा८५.७२० किलो गांजा आढळून आला. दरम्यान सदर मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून जीआरपीने एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.