‘घबाडकुंड’चा बॉक्स ऑफिसवर धडाका

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Ghabadkund in Box office मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘घबाडकुंड’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’नंतर आता या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. प्रदर्शना आधीपासूनच या सिनेमाबाबत मोठी उत्सुकता होती आणि रिलीज झाल्यानंतर त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता निर्मात्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. बॉक्स ऑफिसवरील आकडेवारीनुसार, चित्रपटाने सुरुवातीच्या चार दिवसांत सातत्यपूर्ण कमाई करत एक मजबूत पकड निर्माण केली आहे.
 
 
ghabadkund
 
 
चौथ्या दिवशी कमाईत वाढ झाल्याने चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, मराठी बॉक्स ऑफिसवर आधीपासून चांगली कामगिरी करणाऱ्या इतर चित्रपटांनाही ‘घबाडकुंड’ने कडवी टक्कर दिली आहे. ‘घबाडकुंड’मध्ये संदीप पाठक, देवदत्त नागे, शशांक शेंडे आणि प्राजक्ता हनमघर यांसारख्या दमदार कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. वेगळ्या संकल्पनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना एक नवीन सिनेमॅटिक अनुभव दिला आहे. त्यामुळेच चित्रपटगृहांमध्ये या सिनेमासाठी चांगली गर्दी पाहायला मिळत आहे. अवघ्या 6 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास 3 कोटी रुपयांची कमाई करत बजेटचा मोठा हिस्सा वसूल केला आहे.