शहरातील प्रभाग क्र. 27 विकासापासून वंचित

घनश्याम नगरातील नागरिकांचा संताप

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Ghanshyam Nagar civic issues प्रभाग क्र. 27 अंतर्गत घनश्याम नगर येथील तुटलेली व बुजलेली नाली, साचलेले सांडपाणी तसेच इतर नाल्या व रस्त्यावर नागरी समस्यांबाबत नागरिकांनी उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
 

Ghanshyam Nagar civic issues 
मागील दोन वर्षांपासून नालीची दुरवस्था असून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यापूर्वी तातडीने नाली दुरुस्त करून सिमेंट काँक्रीट रपटा अथवा मोठे सिमेंट पाईप बसविण्याची मागणी नागरिकांनी केली. तसेच प्रभागातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून अनेक नाल्यांचीही अवस्था जीर्ण झाली आहे.त्यामुळे नवीन रस्ते व नाल्यांच्या बांधकामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून कामे हाती घेण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांनी यावेळी नाराजी व्यक्त करत सांगितले की, प्रभागातील सर्व नगरसेवक समस्या जाणून घेण्यासाठी अथवा त्यांचे निराकरण करण्यासाठी परिसरात फिरकत नाहीत. विशेष म्हणजे, Ghanshyam Nagar civic issues  नियोजन सभापती पदावर प्रतिनिधित्व असूनही प्रभागासाठी विशेष निधी मंजूर करण्यात अपयश आल्याचा आरोपही नागरिकांनी केला. उपाध्यक्षांनी लवकरच पाहणी करून प्रभागातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी कैलास मेशाम, निलेश मानकर व सामाजिक कार्यकर्ते दिनेश हरणे उपस्थित होते.