समुद्रपूर,
Gharkul Yojana राज्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधत ग्रामविकास मंत्री जयंत गोरे यांच्याकडे घरकुल योजनेचा प्रलंबित निधी तात्काळ लाभार्थ्यांना वितरित करण्यात यावा अशी मागणी आ. समीर कुणावार यांनी अधिवेेशनात केली.
आ. कुणावार यांनी सभागृहात विविध घरकुल योजनांंतर्गत मंजूर झालेल्या लाखो लाभार्थ्यांना घरकुलासाठी निधी वितरणात होत असलेल्या विलंबाचा मुद्दा उपस्थित केला. अनेक लाभार्थ्यांनी घरकुलांची कामे सुरू केली असून काहींनी कर्ज काढून किंवा तात्पुरत्या निवार्यात राहून बांधकाम पूर्णत्वाकडे नेले आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून निधी न मिळाल्याने त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच नवीन एसएलएसपीएस प्रणालीमधील तांत्रिक त्रुटींमुळे अनेक पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित राहिले असून निधी वितरण थांबले असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.
यावर ना. गोरे Gharkul Yojana यांनी उत्तर देताना घरकुल लाभार्थ्यांच्या निधीबाबत शासन सकारात्मक असून लवकरच प्रलंबित निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे सांगितले.