पुलगावात महेश नवमी उत्साहात

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
पुलगाव,
Mahesh Navami माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी (उत्पत्ती दिन) उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. माहेश्वरी मंडळाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी ६ वाजता बालाजी मंदिर येथून प्रभातफेरी निघाली. शहरभ्रमणानंतर बडकेश्वर महादेव मंदिरात समारोप झाला. त्यानंतर भगवान शिवची पूजा-अर्चना व अभिषेक करण्यात आला. सकाळी ११ वाजता रतदान शिबिर घेण्यात आले.
 

Mahesh Navami celebration Pulgaon 
शिबिरात ३० जणांनी रतदान केले. सायंकाळी ५ वाजता मदनमोहन भवनापासून बॅण्ड पथक, भजन मंडळी आणि चार धाम यांच्या झायांसह शोभायात्रा काढण्यात आली. मदन मोहन भवनात महेश वंदना सादर करण्यात आली. नात्यांचा एक धागा या विषयावर नाटक सादर Mahesh Navami करण्यात आले. यावेळी किसनलाल भट्टड, सत्यनारायण चांडक, डॉ. नंदलाल राठी, सतीशबाबू गांधी, विनोदकुमार जावंधिया, शरद पनपालिया या कुटुंबांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी धर्मेंद्र मुंधडा होते.