भगवान शंकराच्या सानिध्यात वैरीही एकत्रमग संसारात मतभेद का: राधेश्याम चांडक

माहेश्वरी समाज वंशोत्पत्ती दिवस महेश नवमी साजरी

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
बुलडाणा
maheshwari community भगवान शंकराच्या सानिध्यात त्यांच्या गळ्यातील नाग, त्यांचे वाहन नंदी, माता पार्वतीचे वाहन वाघ, कार्तिकेयचे वाहन मोर व गणपतीचे वाहन उंदीर हे सर्व एक दुसर्‍यांचे वैरी असूनही गुण्यागोविंदाने एकत्र राहतात मग संसारामध्ये मानव समाजात मतभेद का असे प्रतिपादन बुलडाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी महेश नवमी निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात केले.
 
mahesh navami
 
maheshwari community सेवा,त्याग व सदाचार या त्रिसूत्री मध्ये सदैव अग्रेसर असलेल्या माहेश्वरी समाजाचा वंशोत्पत्ती दिवस म्हणून देशभरात महेश नवमी साजरी केली जाते. बुलडाणा येथे मंगळवार दि.२३ जून रोजी सकाळी महेश भगवान यांचा अभिषेक करून शहरातील मुख्य मार्गाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये समाजातील ज्येष्ठ नागरिक, बंधू ,भगिनी, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सचिन गांधी व सौ.खुशी गांधी यांनी धारण केलेली श्री.शंकर पार्वती यांची वेशभूषा आकर्षक ठरली. जय महेश च्या उद्घोषाने परिसर दुमदुमून गेला.सोबतच विविध कार्यक्रम जसे की जागतिक योग दिन, वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन, रक्तदान शिबर आयोजित करण्यात आले होते.
 
maheshwari community महेश नवमी प्रित्यर्थ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बुलडाणा अर्बन च्या गोवर्धन सभागृहात करण्यात आले. यामधे सुरुवातीला शिवतांडव नृत्य व महेश पूजन करून महेश वंदना प्रस्तुत करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर बुलडाणा अर्बन चे संस्थापक राधेश्याम चांडक , बुलडाणा अर्बन अध्यक्ष डॉ.सुकेश झंवर, माहेश्वरी मंडळ अध्यक्ष महेंद्र झंवर, माहेश्वरी महिला मंडळ सचिव मीनल मुंदडा, उपाध्यक्ष प्रेमा राठी व माहेश्वरी युवा संगठण चे जिल्हाध्यक्ष कन्हैया बंग यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डॉ.सुकेश झंवर यांनी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी माहेश्वरी समाजाचे योगदान या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
 
maheshwari community माहेश्वरी कार्यकारिणी द्वारे घेण्यात आलेल्या समाजउपयोगी कार्यक्रमांची प्रस्तावना डॉ.पवन बजाज यांनी सांगितली.सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुलांसाठी आयोजित शिव गुण चिंतनस्पर्धेमध्ये बालकांची प्रस्तुती उपस्थितांसाठी आकर्षक ठरली. कार्यक्रमादरम्यान प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे, विशेष पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे, रक्तदात्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोपटे देऊन सत्कार करण्यात आले.
 
maheshwari community यावेळी माहेश्वरी मंडळची नवीन कार्यकारिणी जाहीर करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अध्यक्षपदी नरेश मुंदडा, सचिव निलेश बाहेती, उपाध्यक्ष अशोक बजाज, रतनलाल तापडिया, कोषाध्यक्ष रितेश लढ्ढा, प्रसिद्धीप्रमुख डॉ.पवन बजाज व इतर सदस्यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचा शेवट स्नेहभोजनाने करण्यात आला.कार्यक्रमाच्या नियोजनासाठी माहेश्वरी मंडळ, माहेश्वरी महिला मंडळ व माहेश्वरी नवयुवक मंडळ च्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिरा चांडक व आभार प्रदर्शन नितीन डोडिया यांनी केले.