मृगाने दिला दगा, आर्द्राने सावरले!

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे),
Mrig Nakshatra rainfal खरीप हंगामातील महत्त्वाचे मृग नक्षत्र कोरडे गेले. परंतु, आर्दा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बरसलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. सोमवार आणि मंगळवारी परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी पिकांची लागवड करण्यात व्यस्त झाला आहे.
 


Mrig Nakshatra rainfal 
यावर्षी रोहिणी आणि मृग नक्षत्र अक्षरश: कोरडे गेले. शेतकर्‍यांनी शेतीची मशागत पूर्ण करून खरीप हंगाम सजविण्यासाठी बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी करून ठेवली होती. वाट फत पावसाचीच होते. आर्द्रा नक्षत्रात गाढवाचे वाहन असून पहिल्या दिवशी गाढवाने दमदार हजेरी लावली. यंदा सोयाबीन पेक्षा कापसाचे क्षेत्रफळ अधिक राहण्याची शयता आहे. गतवर्षी सोयाबीन पिकाने दगा दिला होता. परिणामी, Mrig Nakshatra rainfal  शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली. कपाशीची लागवड करण्याकरिता मजूर मिळेनासे झाले. दोन दिवस झालेल्या समाधानकारक पावसाने आता शेतकरी लागवडीकडे वळला आहे.