नागपूर,
vinayak music group and academy नागपूरमधील अग्रगण्य संगीत समूह विनायक म्युझिक ग्रुप अँड अकॅडमीतर्फे शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ५:१५ वाजता विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मधूरम हॉल, दुसरा माळा, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, मोर भवन, झाशी राणी चौक सीताबर्डी नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन मंगेश पटले यांचे असून ध्वनिव्यवस्थेची जबाबदारी रुचिर झाडे सांभाळणार आहेत. या संगीत मैफिलीचा सर्व संगीतप्रेमींनी आवर्जून आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य: अंजली मुळे, संपर्क मित्र