हिंदू विचारधाराच जगाला मार्ग दाखवेल

प्रमुख संचालिका शांताक्का यांचे प्रतिपादन रा. से. समितीच्या प्रवीण वर्गाचा समाराेप

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Praveen class of Rashtra Sevika Samiti संपूर्ण जगात आपले नेतृत्व व स्वामित्व स्थापित करण्यासाठी एक युद्ध सुरू आहे, लाखाे लाेकांची हत्या हाेत आहे. अशा विपरीत परिस्थितीत ‘वसुधैव कुटुम्बकम्’ व ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ सारखी चिरंतन वैश्विक मूल्ये असलेली हिंदू विचारसरणीच संपूर्ण जगाला सुयाेग्य मार्ग दाखवेल, असे ओजस्वी प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी आज मंगळवारी केले. रा. से. समितीच्या प्रवीण शिक्षा वर्गाच्या समाराेप समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून बाेलत हाेत्या. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात झालेल्या या समारंभात व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सर्वाेच्च न्यायालयातील वकील महामाया चॅटर्जी तसेच प्रमुख कार्यवाहिका अन्नदानम सीता गायत्री व वर्गाधिकारी डाॅ. मुक्ता शर्मा ठाकुर उपस्थित हाेत्या.
 
 
 
shanttaka
 
 
 
आपल्या अतिशय प्रेरणादायी आणि तितक्याच अभ्यासपूर्ण भाषणात प्रमुख संचालिकांनी भारतीय संस्कृतीच्या व वैश्विक मूल्यांच्या विविध अंगांवर प्रकाश टाकला. शांताक्का पुढे म्हणाल्या, आज द्वेषरहित, स्पर्धारहित जीवनासाठी सर्वांना सामावून घेणाऱ्या वैश्विक मूल्ये जपणाऱ्या या भारतीय संस्कृतीचा नव्याने जागर करण्याची आवश्यकता आहे. मात्र, यादृष्टीने हिंदू समाजातील प्रत्येक कुटुंबाने ही चिरंतन मूल्ये व राष्ट्रीय विचार आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. आज साेशल मीडियामुळे समाजमनावर नकारात्मक परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत सुसंस्कृत हिंदू समाजच भारताला भारताच्या स्वरूपात राहण्यासाठी कार्यरत राहील. खगाेलशास्त्रज्ञ वराहमिहिर यांनी आपल्या ‘बृहत्संहिता विश्वकाेशात’ स्त्रियांचा ‘निष्कसमा’ अर्थात ‘शुद्ध साेने’ असा उल्लेख केला आहे. मात्र, आज सर्व महिला अशा आहेत काय? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. स्त्री आज राक्षसी हाेऊन खुद्द आपली पती व मुलांची हत्या करीत आहे. काही महिला इंस्टाग्रामच्या माध्यमातून तरुणींचे ‘ब्रेनवाॅश’ करून त्यांना घर साेडून जाण्यास प्रवृत्त करीत आहेत. अशा महिला कुटुंब वा समाजाला काय दिशा दाखविणार? याचे मूळ कारण त्यांना आपल्या मातृत्व भावनेचा विसर पडून त्या आत्मकेंद्रित झाल्या आहेत. अशा महिलांना याेग्य मार्ग दाखविणे हे आमचे कर्तव्य आहे.
जागृत हिंदूच ‘भयमुक्त बंगाल’ची निर्मिती करतील : महामाया चॅटर्जी
 
 
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये प्रचंड भय व दहशतीचे वातावरण हाेतेे. स्त्रियांना रस्त्यावरून पायी चालण्याचीही भीती वाटत हाेती. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीमुळे सर्वसामान्य जनता पार त्रस्त झाली हाेती. मात्र, हे दहशतीचे वातावरण झुगारून देत आज बंगालमधील हिंदू जागा झाला असून संघटित हाेत आह. यामुळेच बंगालमध्ये आज परिवर्तनाचे वारे वाहात अहेत. आता हे जागृत हिंदूच भयमुक्त बंगालची निर्मिती करतील, असे प्रतिपादन अॅड. महामाया चॅटर्जी यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या, राष्ट्र सेविका समितीच्या सेविका व रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी बंगाली जनतेला निर्भय हाेणे शिकवले. मात्र, 2021 ची विधानसभा निवडणूक आम्ही कधीच विसरू शकणार नाही. सत्ताधारी पक्षाविरुद्ध निवडणूक लढविणारे सुमारे 6500 भाजपा कार्यकर्ते 2 मे राेजी आपल्या घरी जाऊ शकले नाही. कारण त्यांची घरेच तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी जाळून टाकली हाेती. ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात भाजपा कार्यकर्त्यांवर तसेच महिलांवर तृणमूलच्या गुंडांनी प्रचंड अत्याचार केले. संदेशखाली येथे मुसलमानांनी महिलांवर शारीरिक अत्याचार केले. याविषयी असंख्य जनहित याचिका अद्यपाही न्यायालयात प्रलंबित आहेत. मात्र, आता सत्तापरिवर्तन झाल्याने बंगालमधील जनतेच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला आहे, असे प्रतिपादनही महामाया चॅटर्जी यांनी केले.