वर्धा
rain news मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसानंतर शहरातील जुनापाणी चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने चौकाला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे रात्री अनेक वाहनचालकांना वाहनं काढताना अडचणींचा सामना करावा लागला.
rain news दरवर्षी पावसाळ्यात जुनापाणी चौकात मुसळधार पाऊस आल्यास पाणी जमा होत असल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रात्री आलेल्या पावसाचे पाणी सकाळपर्यंत चौकात साचून राहिल्याने या मार्गाने आवागमन करणार्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. काही वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब केला. पहिल्याच मोठ्या पावसात जुनापाणी चौकाची ही अवस्था झाल्याने शहरातील जलनिस्सारण व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
rain news शहरातील नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याचे पहिल्याच पावसात उघडे पडले. सोशालीस्ट चौक ते शिवाजी चौकापर्यंत नाल्या तुंबल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती. पुना गाडगीळ ज्वेलर्स, मनीषा एंटरप्राईज आदी व्यावसायिकांनी तत्काळ मजूर सांगून नालीतील साचलेला गाळ काढून पाणी वाहते केले. कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या रस्ते आणि नाल्यांच्या कामानंतरही ही समस्या कायम असल्याने नागरिकांनी स्थापत्य विभागाच्या नियोजनावर नाराजी व्यत केली आहे.