रोनाल्डोमुळे फिफामध्ये वाजला मराठीचा डंका!

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Ronaldo Makes Waves with Marathi फुटबॉल विश्वचषकाच्या उत्साहात आता मराठीचाही खास रंग मिसळलेला पाहायला मिळत आहे. जगभरातील चाहत्यांशी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधण्याच्या प्रयत्नांत FIFA कडून करण्यात आलेली एक मराठी पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे या पोस्टमधील हटके मराठी वाक्यामुळे मराठी चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.फिफा ने अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याचा फोटो शेअर करत “रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय” अशी कॅप्शन दिली. या एका वाक्याने मराठी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि पोस्टवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला.
 
 
yui789
 
या पोस्टवर अनेक मराठी चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. “मराठीतही फिफा बोलतंय”, “कोल्हापुरी टच भारीच”, “जगात भारी आमची मराठी” अशा कमेंट्स मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. विशेषतः कोल्हापुरी ढंगातील भाषेचा वापर चाहत्यांना अधिकच भावला. दरम्यान, महाराष्ट्रातील फुटबॉलप्रेमींमध्ये विश्वचषकाची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. विशेषतः कोल्हापूरमध्ये फुटबॉलविषयी प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. शहरातील विविध भागांमध्ये स्टार खेळाडूंचे कटआउट्स, बॅनर्स आणि होर्डिंग्ज झळकत असून, लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्या चाहत्यांमध्ये वेगळीच रंगत दिसून येत आहे. एकूणच, फिफाA ने मराठीसह विविध भारतीय भाषांमध्ये चाहत्यांशी साधलेला संवाद हा केवळ सोशल मीडिया स्ट्रॅटेजी नसून, स्थानिक भाषांशी जोडण्याचा प्रभावी प्रयत्न ठरत आहे. त्यामुळे मराठी चाहत्यांमध्ये या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे.