सिद्धेश्वर शिव मंदिरात उत्साहात साजरा आंतरराष्ट्रीय योग दिन

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
international-yoga-day : 'वन बंधू परिषद' (नागपूर शाखा), 'नागपूर महिला समिती' आणि 'एकल ग्राम संघटन' यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी सिद्धेश्वर शिव मंदिर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात ४० ते ४५ नागरिकांनी सहभाग घेत योगाचे महत्त्व जाणून घेतले.
 
 
international-yoga-day
 
योगगुरू आशा अग्रवाल यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करत त्यांचे आरोग्यदायी फायदे उपस्थितांना समजावून सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात ‘ॐ’च्या उच्चाराने आणि शांती मंत्राने करण्यात आली.
 
कार्यक्रमादरम्यान योगगुरू आशा अग्रवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
 
कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन मणी गोयंका व प्रभा पुराणिक यांनी केले. संस्थेच्या अध्यक्षा अनुसूया अग्रवाल, सचिव ममता केडिया तसेच योग दिन समन्वयक प्रभा पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागींसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.