सोनार सेवा महासंघाद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा

यवतमाळ,
Sonar Seva सोनार समाजातील इयत्ता दहावी, बारावी आणि इतर शैक्षणिक अभ्यासक्रमात गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सोनार सेवा महासंघातर्फे रविवारी गौरव करण्यात आला. येथील संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण विभागाच्या परीविक्षा अधिकारी अर्चना माळवी उपस्थित होत्या. व्यासपीठावर डॉ. विद्या पाचकवडे, सोनार सेवा महासंघाच्या महिला विभाग अध्यक्ष चारुलता पावसेकर, विदर्भ संघटक सीमा बिंनोड, नगरसेवक शोभा हर्षे उपस्थित होत्या. अतिथींच्या हस्ते नरहरी महाराजांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
 

crop loan distribution Yavatmal  
यावेळी गुणवंत विद्यार्थी हर्ष सुनील उज्जैनकर, रिद्धी मंगेश मांडळे, सुजल एकनाथ खरवडे, रुद्रांश दिनेश बांगरे, गौरी अनिल भुदुकले, अक्षरा राहुल गुरव, सोनाक्षी नितीन गुरव, खुशाल महेश अर्धापुरकर, अमेया महेश टेंबरे, रिया किशोर मस्के, जानवी प्रशांत सावळकर, हर्षल चंद्रकांत येरपुडे, सृष्टी राजेश खरवडे, प्रणव प्रमोद बाहाड, मानसी अमोल बहाड, समृद्धी राजेश खरवडे, अमृता मनोज जंगमवार, श्लोक अनिल देशपांडे, करपुरा प्रदीप मुडे, रिद्धी राजेश तळणकर, पायल विकास जावळकर, ईशान्य मुकेश खरवडे, गौरव प्रमोद निनावे, पाणेरी अरविंद पोगडे, गोजिरी अरविंद पोकडे यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यासोबतच सोनार सेवा महासंघाचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण हर्षे, अभियंता अरूण सागळे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अद्विता उदावंत यांनी केले.