मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेला प्रारंभ

बीएलओ देणार घरोघरी भेट

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
बुलढाणा
voter list revision  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे विशेष पुनरीक्षण अभियान २० जून २०२६ पासून सुरू करण्यात आले असून मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व दोषमुक्त करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शरद पाटील यांनी केले आहे.
 
buldhana photo
 
voter list revision या मोहिमेअंतर्गत २० ते २९ जूनदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व सहाय्यक कर्मचारी अशा एकूण ४७१ अधिकारी-कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जात आहे.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ३० जूनपासून बीएलओ मतदारसंघातील प्रत्येक घराला भेट देणार आहेत. दि. २३ जून रोजी सहकार विद्या मंदीर सभागृहात प्रशिक्षण पार पडले. या प्रसंगी बुलढाणा तहसिलदार विठ्ठल कुमरे मोताळा तहसिलदार श्रीमत सरीता खटाव उपस्थित होते.
 
 
voter list revision घरभेटीदरम्यान मतदार नोंदणीसंदर्भातील माहिती संकलित करणे, गणना फॉर्मचे वाटप व संकलन करणे तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक माहिती घेण्यात येणार आहे.या विशेष मोहिमेत अनुपस्थित स्थलांतरित, मृत, दुबार तसेच परदेशी नागरिकत्व स्वीकारलेले मतदार यांची पडताळणी करून आवश्यक ती नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच पात्र नागरिकांची नोंदणी आणि यादी शुद्धीकरणावर भर दिला जाणार आहे.प्रशासनाने नागरिकांना आपल्या घरी येणार्‍या बीएलओंना योग्य व अचूक माहिती देण्याचे आवाहन केले आहे. कुटुंबातील मृत व्यक्ती किंवा स्थलांतरित झालेल्या मतदारांची माहिती देऊन मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.मतदार यादीचे शुद्धीकरण हे सशक्त लोकशाहीचे महत्त्वाचे लक्षण असल्याने या राष्ट्रीय उपक्रमात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.