‘सुपर 50’ साठी गुरुवारी परीक्षा

2062 विद्यार्थी, 10 परीक्षा केंद्र : ऑफलाईन पद्धतीने होणार परीक्षा

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
यवतमाळ,
Super 50 Yavatmal, जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना जेईई आणि एनईईटी (नीट) परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘सुपर 50’ उपक्रमांतर्गत 2062 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या विद्यार्थ्यांची निवड परीक्षा गुरुवा, 25 जून रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेतच घेतली जाणार आहे.
या परीक्षेसाठी जिल्ह्यात 10 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले असून त्यानुसार यवतमाळ येथे 4 व पुसद, उमरखेड, दारव्हा, वणी, राळेगाव आणि पांढरकवडा या ठिकाणी प्रत्येकी एक अशा 10 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.
 

Super 50 Yavatmal 
त्यामध्ये यवतमाळच्या रमाबाई आंबेडकर विद्यालय, विवेकानंद विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय आणि जि. प. माध्यमिक शाळा गोधणी रोड हे परीक्षा केंद्र आहेत. तर पुसद येथील कोषटवार दौलतखान विद्यालय, उमरखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, दारव्हा येथील न. प. शाळा क्र. 2, वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय, राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल, पांढरकवडा येथील जि.प माध्यमिक शाळा येथे ही परीक्षा घेतली जाणार आहे. ‘
 
 
सुपर 50’ परीक्षेसाठी जिल्ह्यातील 2062 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यानुसार यवतमाळ मधील चार परीक्षा केंद्रावर 772 विद्यार्थी, पुसद 360, उमरखेड 293, दारव्हा 217, वणी 114, राळेगाव 97 आणि पांढरकवडा येथे 209 असे एकूण 2062 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
रोल नंबर, परीक्षा केंद्राची माहिती मोबाईलवर
ही परीक्षा अ‍ॉफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षार्थी क्रमांक (रोल नंबर), परीक्षा केंद्राची माहिती विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात आली आहे. तसेच ही माहिती गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालय, परीक्षा केंद्र तसेच गुगल ड्राईव्हद्वारे अ‍ॉनलाईन उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबत काही अडचणी असल्यास गटशिक्षणाधिकाèयांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या दिल्या सूचना
सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर Super 50 Yavatmal, सकाळी 11:30 वाजेपर्यंत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परीक्षा सुरु झाल्यानंतर उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्रावर येतांना विद्यार्थ्यांनी आपली ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड, इयत्ता 10 वी एसएससी बोर्ड परीक्षेचे हॉलतिकीट सोबत आणणे आवश्यक आहे. ओळखपत्राशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांनी निळ्या किंवा काळ्या बॉलपेनचा वापर करणे आवश्यक आहे.