राजू कोठडीत, मुस्कान फरारच!

सावंगीतील देहव्यापार प्रकरण

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
वर्धा,
Wardha police सावंगी (मेघे) भागातील कृष्णाई नामक इमारतीतील एका सदनिकेत सुरू असलेल्या देहव्यापाराचा पोलिसांच्या चमूने २० रोजी भंडाफोड करून एका महिलेची सुटका केली. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार मुस्कान उर्फ शबनम नामक महिला फरार आहे. आरोपी राजू उर्फ नीलेश आदेवार (२१) रा. तुकाराम वार्ड रामनगर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
 

Wardha police  
राज्यातील आणि राज्याबाहेरील मुली-महिलांनाकडून देहव्यापार करून घेणारी मुख्य सुत्रधार मुस्कान उर्फ शबनम नामक महिलेच्या Wardha police शोधार्थ सावंगी पोलिसांची दोन पथकं रवाना करण्यात आले आहेत. पण, मुस्कान सध्या पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे. अटक केलेल्या राजू उर्फ नीलेश आदेवार याला सुरूवातीला न्यायालयात हजर केले असता त्याची तीन दिवसांकरिता पोलिस कोठडीत रवानगी केली होती. पोलिस कोठडी संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूचा युतिवाद लक्षात घेऊन न्यायालयाने राजू उर्फ नीलेश आदेवार याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याचे सावंगी पोलिसांनी सांगितले.