वाशीम जिल्ह्यात कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस

* २४ जून पर्यंत ४७.८ मि.मी. पावसाची नोंद * शेतकरी सुखावला * खरीप पेरणीची लगबग

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
वाशीम,
washim heavy rainfall जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून जिल्ह्यात मंगळवार व बुधवारी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील काही भागात जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असून, शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. १ ते २४ जून पर्यंत जिल्ह्यात ४७.०८ मि.मी. पावसाची नोंद झाली. वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून २३ व २४ जून रोजी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. वाशीम शहर व तालुक्यात २४ जून रोजी दुपारी १२ ते २ या दरम्यान सर्वदूर पाऊस पडला. काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. जिल्ह्यातील वाशीम, कारंजा, मंगरूळनाथ, मानोरा, रिसोड आणि मालेगाव तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. कृषी तज्ज्ञांच्या मते, हा पाऊस अद्याप मान्सूनचा नसून स्थानिक वातावरणीय बदलामुळे झाला आहे.
 
 

heavy rainfall 
 
 
त्यामुळे शेतकर्‍यांनी घाईघाईने पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. गेल्या वर्षी पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे अनेक शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. त्यामुळे यंदा पुरेसा आणि स्थिर पाऊस झाल्यानंतरच खरीप पेरणी सुरू करण्याचा विचार शेतकरी करत आहेत. वाशीम तालुयात शेतकर्‍यांनी हळद पिकाची लागवड केली. मात्र, पाऊस नसल्याने अनेक शेतकर्‍यांचे हळद बियाणे शेतातच खराब झाले. मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंदाचे वातावरण आहे.washim heavy rainfall दरम्यान, वातावरणातील बदलामुळे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची पेरणीसाठी लगबग वाढली आहे.शेतकर्‍यांनी घाई न करता हवामानाचा अंदाज आणि कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
२४ जून पर्यंत ४७.८ मि.मी. पावसाची नोंद
वाशीम जिल्ह्यात १ ते २४ जून पर्यंत ४७.०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात जून ला वाशीम तालुक्यात १३.०१ मि.मी., रिसोड तालुयात १८.०८ मि.मी., मालेगाव तालुयात ६.०९ मि.मी, मंगरुळनाथ तालुयात १२.०५ मि.मी, मानोरा तालुयात ९.०६ मि.मी तर कारंजा तालुक्यात सर्वाधिक २०.०४ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर २३ जून रोजी वाशीम तालुक्यात २३.०८ मि.मी, रिसोड ६.०४ मि.मी, मालेगाव ८.० मि.मी, मंगरुळनाथ ३२.०१ मि.मी, मानोरा ३१.०२ मि.मी. तर कारंजा तालुयात १०. ०२ मि.मी. पाऊस पडला. सदर पावसाने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून, खरीप पेरणीची लगबग सुरु झाली आहे. मृग नक्षत्राच्या सुरवातीला पावसाने उघाड दिल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या, त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र, जून च्या शेवटच्या आठवड्यात पावसाने काही ठिकाणी मध्यम तर कुठे जोरदार हजेरी लावल्याने नागरीकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला तर शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे.