अविनाश भोपे,
पुलगाव,
picture-boys : नजीकच्या विजय गोपाल या छोट्या खेड्यातील गरीब कुटुंबातील नीलेशसिंग सुनील सिंग राजपूत (२८) या युवकाने लेखक आणि दग्दिर्शक भूमिका पार पाडून पिक्चर बॉईजफ नावाचा मराठी चत्रिपट प्रदर्शित केला. १५ मे रोजी तो सिनेमा महाराष्ट्रातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला. नीलेशने सात वर्षे संघर्षातून आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे नाव मुंबईपर्यंत पोहोचविले आणि सिनेमा प्रदर्शित करून इतिहास घडविला आहे. या चत्रिपटात त्याची स्वत:ची भूमिकाही एका मराठी कलाकाराने केली असून चत्रिपटात गावाचे नावही विजय गोपाल दाखवण्यात आले आहे.
नीलेशचा जन्म विजय गोपाल येथे झाला असून त्याचे बालपण व माध्यमिक शक्षिण सुद्धा येथेच झाले. कुटुंबाची परस्थितिी हालाकीची होती. त्या दिवसांसोबत संघर्ष करीत सात वर्षांपूर्वी नीलेशने चत्रिपटात नट होण्याच्या आशेने मुंबई गाठली. त्यापूर्वी निलेश वर्धा येथील एका इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शक्षिक होता. निलेशचे आई वडील शेती आणि रोज मजुरीचे कामे करतात. छोट्याशा खेडेगावातील मुलाने आपल्या जद्दिीने चिकाटीने आणि अथक परश्रिमाने यश मिळवले.
नीलेशच्या दग्दिर्शनात आणि लेखनातील या पिक्चर बॉईज या चत्रिपटात नीलेशने आत्मकथा सांगितलेली आहे. या चत्रिपटामध्ये एका छोट्याशा खेडेगावातील मुलगा चत्रिपटात नट होण्याकरिता, मुंबईसारख्या मायानगरीत जातो. तिथे त्याला कुठल्या समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागला. त्यातून त्याला यश प्राप्त कसे करता आले, ते चत्रिपटातून दाखवले आहे. या चत्रिपटाची कथा, पटकथा, संवादसुद्धा नीलेशसिंग राजपूत यानेच लिहिले आहेत. या चत्रिपटामध्ये मराठी चत्रिपट सृष्टीतील दग्गिज कलाकारांनी काम केले आहे. त्यामध्ये नीलेशची भूमिका प्रतीक लाड या मराठी नटाने केली असून छोटा पुढारी सारखा कॉमेडी नट सुद्धा या चत्रिपटात आहे. प्रतीक लाड या अभिनेत्यांने त्याचे नाव दगडू शिंदे म्हणून सांगितले असून त्याने विजयगोपाल आणि तालुका देवळी येथून आलेला असल्याचे त्या चत्रिपटात सांगितले आहे. गावात जन्मलेला, जि.प.च्या शाळेत शिकलेल्या नीलेशची ही झेप तालुक्याचे नाव उंचावणारी आहे.