आजनसरा
Ashish Kumbhalkar, तो दरवर्षी वारीला जात होता. यावर्षीही त्याने कामं आटोपती घेतली आणि त्याला वारीची आस आगली होती. पंढरीच्या वाटेने जाण्याआधीच आशिषची पावलं काळाने रोखली... १८ वर्षीय युवकाचे अपघाती निधन झाले.
येथील युवा वारकरी आशिष लक्ष्मण कुंभलकर या युवकाला १८ रोजी अपघात झाला. सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात त्याने ८ दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर बुधवारी त्याची प्राणज्योत मावळली. विठ्ठलभक्त, पायदळ वारीचा वारकरी आशिष हा संत Ashish Kumbhalkar भोजाजी महाराजांचा नस्सिीम भक्त होता. दरवर्षी आषाढी वारीत पायदळ पालखीसोबत पंढरीची वाट धरणारा हा हसरा वारकरी यंदाही वारीला जाण्यासाठी आतुर होता. माऊलीच्या भेटीला निघण्याचे स्वप्न त्याने रंगवले होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. वारीला निघण्यापूर्वीच काळाने घाला घातला आणि त्याची वारी कायमची खंडित झाली. विठुरायाच्या चरणी तो आता कायमचा विसावला. आई-वडिलांचा एकुलता हसतमुख, मनमिळाऊ स्वभावाचा आशिष होता.