आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात सोमवारी वर्धेत महामोर्चा

भदत्न राजरत्न यांची पत्रपरिषदेत माहिती

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
वर्धा,
bhadatna-rajaratna : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात व आरक्षण संरक्षणाच्या मागणीसाठी जल्हिाधिकारी कार्यालयावर सोमवार २९ रोजी वर्धेत आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. भदन्त राजरत्न यांनी आज गुरुवार २५ रोजी स्थानिक वश्रिामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 

j lk 
 
 
या मोर्चामार्फत संविधानातील समानता, सामाजिक न्याय आणि अनुसूचित जातींची एकसंघता कायम ठेवण्याची मागणी करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती हा एकसंघ घटक राहावा, अशी भारतीय संविधानाची भूमिका आहे. त्यामुळे उपवर्गीकरणाचा नर्णिय मागे घेऊन वद्यिमान आरक्षण व्यवस्था कायम ठेवावी, उपवर्गीकरणा संदर्भातील अहवाल सार्वजनिक करण्यात यावा व सर्व घटकांना न्याय मिळेल अशी भूमिका शासनाने घ्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघणार असल्याचे भदत्न राजरत्न यांनी सांगितले.
 
 
यावेळी अनिल जवादे म्हणाले की, अनुसूचित जातीतील ५९ जातीकरिता मान्य असलेल्या आरक्षणात सरकारने उपवर्गीकरण करण्यासाठी नियुक्त केलेल्या बदर समितीचा अहवाल जाहीर न करता हरकती मागवल्यिामुळे सरकारने महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये संघर्षाची स्थिती नर्मिाण करण्याचा घाट घातला आहे. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातीचे आरक्षण संपवण्यिाचा सरकारचा डाव असल्याचा आरोप जवादे यांनी केला. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. भदंत राजरत्न व विशाल मानकर करणार असून, समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन अनिल जवादे यांनी केले.
पत्रकार परिषदेला विशाल मानकर, किशोर खैरकार, ॲड. ज्योती कोमलकर, अर्चना नाखले, सावत्रिी नाखले, रंजना ढाले उपस्थित होते.