अनिल कांबळे
नागपूर,
Chhatrapati Chowk Nagpur शहरातील छत्रपती चौक परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास महानगर परिवहन विभागाच्या तीन बसांची विचित्र धडक झाली. या अपघातात बसांच्या काचा फुटून किरकोळ नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मनपा परिवहन विभागाची (एमएच-३१ ईएम-०३९९) क्रमांकाची बस सीताबर्डीहून खापरी डेपोकडे जात होती. छत्रपती चौकातील वाहतूक सिग्नलजवळ बस थांबलेली असताना मागून आलेल्या पीएमआय कंपनीच्या (एमएच-४९ बीझेड-२४३१) क्रमांकाच्या बसने तिला धडक दिली. या धडकेच्या जोरामुळे समोर उभी असलेली ईका कंपनीची (एमएच-४० डीसी-०३६८) क्रमांकाची Chhatrapati Chowk Nagpur बसही धडकली. त्यामुळे तिन्ही बसांचे किरकोळ नुकसान झाले असून काही काचा फुटल्या. या अपघातात कोणत्याही प्रवाशाला, चालक-वाहकाला किंवा इतर व्यक्तीला दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेबाबत धंतोली पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.