जिल्ह्यात दुसर्या दिवशी १३ तालुक्यातील गावात संततधार
*सरासरी ३३.२ मिमी पावसाची नोंद
*खामगाव सर्वाधिक ५६.९ मिमी पाऊस, सिंदखेडराजा सर्वात कमी ९.७ मिमी
दिनांक :25-Jun-2026
Total Views |
बुलढाणा,
continuous-rain : गेल्या २४तासात दुसर्या दिवशी रात्री व सकाळी तेरा तालुयातील गावात सततधार ३४मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. रुईखेड मायंबा भडगाव चिखली परिसरात पावसाने चार तास वाहतूक ठप्प झाली होती. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये एकूण ४३१.५ मिमी पाऊस पडला आहे.
तालुकानिहाय पावसाच्या नोंदीनुसार खामगाव तालुयात सर्वाधिक ५६.९ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल बुलढाणा तालुक्यात ४५.१ मिमी, चिखली तालुयात ५१.२ मिमी, शेगाव तालुयात ४४.३ मिमी आणि जळगाव जामोद तालुयात ४१.१ मिमी पावसाची नोंद झाली. सिंदखेड राजा तालुयात सर्वात कमी ९.७ मिमी पाऊस झाला. हंगामातील एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत देऊळगाव राजा तालुयात ८५.२ टक्के, मेहकर तालुयात ८२.५ टक्के आणि चिखली तालुयात ७०.० टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २५५.३ मिमी पाऊस झाला असून तो वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या ७.७१ टक्के आहे. जिल्हा प्रशासनाच्या पर्जन्यमान अहवालानुसार पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.