सायबर गुन्हेगाराने पाठवला काउंटंटला पैशांसाठी मेसेज

९८ लाखांची सायबर फसवणूक

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
cyber fraud शहरातील एका कंपनीच्या संचालकांच्या नावाने अकाउंटंटला बनावट मेसेज पाठवून सायबर गुन्हेगाराने तब्बल ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीच्या संचालकांच्या नावाने आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवून अकाउंटंटने संबंधित रक्कम गुन्हेगाराने दिलेल्या बँक खात्यात वर्ग केली. फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
 

cyber fraud 
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील एका कंपनीच्या अकाउंटंटचा मोबाईल आणि लॅपटॉप एकमेकांशी जोडलेले होते. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगाराने कंपनीच्या संचालकांच्या नावाने अकाउंटंटच्या लॅपटॉपवर ९८ लाख रुपये तातडीने हस्तांतरित करण्याचा मेसेज पाठविला. त्या वेळी कंपनीचे संचालक व्यावसायिक कामानिमित्त जपान दौऱ्यावर असल्याने अकाउंटंटला हा मेसेज खरा असल्याचे वाटले. कोणतीही खातरजमा न करता त्याने मंगळवारी दुपारी संबंधित रक्कम सायबर गुन्हेगाराने दिलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केली. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही संचालकांकडून या व्यवहाराबाबत कोणतीही चौकशी न झाल्याने अकाउंटंटने स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी संचालकांनी असा कोणताही मेसेज पाठविलेला नसल्याचे स्पष्ट केले.cyber fraud  त्यानंतर अकाउंटंटच्या लक्षात आले की, तो सायबर फसवणुकीचा बळी ठरला आहे. प्राथमिक तपासात सायबर गुन्हेगारांनी अकाउंटंटच्या मोबाईलशी जोडलेल्या कंपनीच्या डिजिटल लिंक अथवा संवाद प्रणालीमध्ये हस्तक्षेप करून बनावट संदेश पाठवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फसवणुकीची खात्री झाल्यानंतर अकाउंटंटने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित बँक खात्यांचा तपशील, व्यवहाराची साखळी आणि वापरलेली तांत्रिक पद्धत यांचा तपास सुरू आहे.