जिल्हा पोलिस दलात ३० अत्याधुनिक वाहने

पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या संकल्पनेतून पोलिस दलाचे आधुनिकीकरण

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
pankaj-bhoyar : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारातून जिल्हा पोलिस दल आधुनिकतेकडे वाटचाल करतो आहे. गेल्या काही दिवसांत विविध प्रकारच्या सुविधा विभागास उपलब्ध करून देण्यात आल्या असून नव्याने १५ अत्याधुनिक वाहनांसाठी २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मंजूर केला आहे. लवकरच ही वाहने पोलिस दलात दाखल होणार आहे.
 

hjh 
 
 
गेल्या काही दिवसात पोलिसांचा ताण वाढला आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे या विभागावर कामाच्या अतिरक्ति जबाबदार्या येऊन पडल्या. त्यामुळे विभागाचा ताण कमी करण्यासोबतच अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी आधुनिक संसाधने उपलब्ध करून देण्यावर पालकमंत्री भोयर यांचा भर आहे.
 
पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या पुढाकाराने पोलिस दलास ३० वाहने उपलब्ध होत आहे. त्यापैकी पहल्यिा टप्प्यात १५ वाहने उपलब्ध झाली आहेत. त्यात टीव्हीएस रायडर दोन, ईरटीगा इंटरसेप्टर, मोबाईल सर्विलन्स व्हॅन सहा, २५ शिटर आयशर बस दोन, फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन चार या वाहनांचा समावेश आहे. दुसर्या टप्प्यात १५ अत्याधुनिक चारचाकी वाहने मंजूर करण्यात आली आहे.
 
 
पुलगाव, आर्वीत सीसीटीव्ही सर्वेलन्स प्रकल्प
 
 
गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अतिशय उपयुक्त ठरतात. अनेक प्रकरणात गुन्ह्यांचा उलगडा किंवा गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी या कॅमेऱ्याची मदत होते. त्यामुळे ज्ह्यियातील शहरांवर या कॅमेऱ्याची नजर ठेवण्यासाठी ज्ह्यियातील मोठ्या शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्प राबवण्यिाचा नर्णिय घेतला. त्यासाठी आवश्यक निधी देखील उपलब्ध करून दिला. पुलगाव व आर्वी शहरात सीसीटीव्ही सर्वेलन्स प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी १० कोटी ८ लाखांचा निधी मंजूर केला आहे.