भरधाव टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
मालेगाव
Fatal Road Accident २५ जून पोलिस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सी वरील धारपिंपरी गावाजवळ भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक २४ जून रोजी दुपारी घडली आहे. या प्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 

Fatal Road Accident  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंधाना तालुका रिसोड येथील मदन बालाप्रसाद बाहेती वय ४३ हे त्यांची भावजय लता सुरजमल बाहेती वय ३७ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी वाशीम येथील रुग्णालयात घेऊन गेले होते. उपचारानंतर दोघेही मोटारसायकल क्रमांक एम. एच. ३७ ए. जे. ९१६३ वरून गावाकडे परतत होते. दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास धारपिंपरी गावाजवळ समोरून येणार्‍या टँकर क्रमांक एम. एच. ३० बी. डी. २५८७ चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत लता बाहेती रस्त्यावर पडल्या आणि टँकर त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. तर मदन बाहेती हेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले.
अपघातानंतर टँकर चालक Fatal Road Accident  घटनास्थळावरून पसार झाला. स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय, मालेगाव येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती लता बाहेती यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मदन बाहेती यांच्या तक्रारीवरून संबंधित टँकर चालकाविरुद्ध मालेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजाराम कालापाड करीत आहेत.