कारंजात आणीबाणीच्या काळ्या दिवसांची आठवण

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
कारंजा (घा.),
emergency-days : लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या आणीबाणीच्या कालखंडाला ५१ वर्षे पूर्ण झाल्यानिमत्ति भाजपा कारंजा (घा.)च्या वतीने मआणीबाणीची ५१ वर्षे : लोकशाही, संविधान आणि नागरिकांचे अधिकार या विषयावर विशेष व्याख्यान व लोकशाही स्मरणफ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
 
j
 
 
 
अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अजाबराव भोकरे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक, राष्ट्रभक्तीपर व संघटनात्मक योगदानाचा गौरव म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला.
 
प्रमुख वक्ते म्हणून भाजपा अनुसूचित जाती मोर्चा वर्धा ज्ह्यियाचे अध्यक्ष अशोक विजयकर यांनी १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीची पृष्ठभूमी, त्या काळातील राजकीय व सामाजिक परस्थितिी, लोकशाही संस्थांवरील परिणाम, प्रसारमाध्यमांवरील नर्बिंध तसेच संविधानिक मूल्यांचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.
 
 
लोकशाही ही केवळ शासन व्यवस्था नसून ती नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करणारी जीवनपद्धती आहे. संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव ठेवून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहणे आवश्यक असल्याचे विजयकर म्हणाले.
 
प्रास्ताविक भाजपा कारंजा तालुका मंडळ अध्यक्ष चक्रधर डोंगरे यांनी केले. संचालन संयोजक प्रेम महिले यांनी केले तर आभार सहसंयोजक सतिष पठाडे व व्यवस्थापण पुरुषोत्तम अग्रवाल यांनी केले.
 
 
यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, युवक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी लोकशाही मूल्यांचे जतन, संविधानाचा सन्मान आणि राष्ट्रहितासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.