‘क्यूकी सास भी कभी बहू थी’मध्ये येणार दहा वर्षांचा लीप

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
मुंबई
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu thi क्यूकी सास भी कभी बहू थी आता आपल्या कथेतला सर्वात नाट्यमय आणि भावनिक टप्पा गाठणार आहे. दहा वर्षांचा लीप घेतल्यानंतर, तुलसी विराणी तुरुंगातून परत शांतीनिकेतनमध्ये येत आहे. मात्र, ज्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी तिने रक्ताचं पाणी केलं होतं ते आता खोलवर दुभंगलेले आहे. तिची मुलं करण आणि गौतम आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्यामुळे मालिकेत भावनांचा आणि नात्यांचा तीव्र संघर्ष रंगणार आहे.
 

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu thi  
करणची भूमिका करणारा हितेन तेजवानीसाठी, तुलसीच्या परत येण्याने जुन्या जखमा आणि काही अनुत्तरित प्रश्न पुन्हा उघडे पडले आहेत. आईच्या परतीचा स्वीकार करताना करणला स्वतः शीच खूप संघर्ष करावा लागतो आहे. तुलसीला मात्र या कठोर वास्तवाला सामोरे जावे लागते आहे की शांतीनिकेतनच्या ज्या ऐक्यासाठी ती लढली होती ते एकसंध राहिलेले नाही. आता तुलसी विराणी पुन्हा विराणी कुटुंबातील तडे भरून त्यांना एकत्र आणू शकेल का?
 
मालिकेतील या महत्त्वाच्याKyunki Saas Bhi Kabhi Bahu thi  अध्यायाबद्दल बोलताना हितेन तेजवानी म्हणाले “शांतीनिकेतनमध्ये आता तुझ्यासाठी जागा नाही” हे करणने आपल्या तुलसी माँला सांगितलेले कदाचित सर्वात कठोर वाक्य आहे. करणने कधीही कल्पना केली नव्हती की त्याला असे म्हणावे लागेल. 10 वर्षांनंतर तुरुंगातून परतलेल्या तुलसी माँला आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसतो. हा ट्रॅक क्यूंकी सास भी कभी बहू थी च्या प्रवासातील सर्वात भावनिक अध्याय ठरणार आहे. करणसाठी तुलसी माँ नेहमीच विश्वास ठेवण्यासारखी आणि आदर्श होती. मात्र तिच्या परतीने त्याला अशा भावनांचा सामना करावा लागतो, ज्यांचा विचारही त्याने कधी केला नव्हता. या कथानकाची खासियत म्हणजे हे फक्त करणच्या रागाबद्दल नाही, तर एका मुलाच्या मनातील तुटलेपणा, निराशा आणि अनुत्तरित प्रश्नांबद्दल आहे. त्यामुळे हा प्रवास प्रेक्षकांना खूपच जवळचा वाटेल. करण आणि गोमजी कुटुंब आणि तुलसीच्या स्थानाबद्दल वेगवेगळ्या विचारांवर उभे राहतात. त्यामुळे प्रेक्षकांना भावनांचा रोलरकोस्टर अनुभवायला मिळणार आहे”