जंगलात बसने सोडली साथ; प्रवाशांची तारांबळ उडाली

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
धानोरा,

MSRTC Bus महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस २४ जुनला सकाळी गडचिरोलीहून मुरूमगावमार्गे सावरगावकडे जात असताना सावरगाव, चातगाव गावाजवळील जंगल परिसरात अचानक बंद पडली. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
 

MSRTC Bus 
बस जंगल परिसरातच थांबल्याने महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच कामानिमित्त प्रवास करणारे प्रवासी अडकून पडले. दुर्गम भाग असल्याने दुसऱ्या वाहनाची व्यवस्था होईपर्यंत प्रवाशांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. उन्हाचा त्रास आणि वाहतुकीची मर्यादित साधने यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.दरम्यान, बस बंद पडल्याची माहिती मिळताच संबंधित विभागाला कळविण्यात आले. MSRTC Bus  तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून बस दुरुस्त करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया गेला असून एसटी प्रशासनाने बसेसची नियमित तपासणी करून सुरक्षित व सुरळीत सेवा उपलब्ध करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी ही जीवनवाहिनी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी बसेसची वेळोवेळी देखभाल करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.