केस जास्त कापल्याच्या वादातून न्हाव्याने ग्राहकावर चाकुहल्ला

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर
barber attack case कटींग करीत असताना न्हाव्याचा अधिकचे केस कापल्यावरुन ग्राहकाशी वाद झाला. वादातून संतापलेल्या न्हाव्याने शिवीगाळ करत चाकूने ग्राहकावर हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांजरा परिसरात घडली आहे.
 

Nagpur stabbing incident, barber attack case, 
अजय सुधाकर कुंभारे (४९, पांजरा) हे ऑटो रिक्षा चालविण्याचे काम करतात. त्यांची हिमांशू अमुल्यकुमार डे (वय ६७) याच्याशी ओळख होती. हिमांशू डे याचे सलून आहे. अजय कुंभारे हे त्याच्याकडे नियमितपणे केस कापण्यासाठी जात होते. महिनाभरापूर्वी हिमांशू डे याने अजय कुंभारे यांचे केस कापताना जास्त केस कापले. याच कारणावरून २३ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास अजय कुंभारे हे हिमांशू डेच्या घरी गेले आणि या प्रकाराचा जाब विचारला. त्यावेळी आरोपीने अजय कुंभारे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. barber attack case  कुंभारे यांनी शिवीगाळ करण्यास विरोध केल्याने आरोपी संतापला व त्याने घरातून भाजी कापण्याचा चाकू आणला. त्याने चाकूने कुंभारे यांंच्यावर हल्ला केला. त्यात त्यांच्या हनुवटी, गळ्याजवळ व डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांनी कोराडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलीस त्यांना मेयोत उपचारासाठी घेऊन गेले. त्यांच्या तक्रारीवरून डेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.