तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या चर्चांना पूर्णविराम?

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
मुंबई,
No transfer for Tukaram Mundhe अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज शैलीची छाप उमटवली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ, औषधे आणि संशयास्पद व्यवहारांवर सुरू असलेल्या कठोर कारवाईमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः ड्रग्जविरोधातील मोहिमेमुळे अनेकांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा आहे. मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाने विविध ठिकाणी छापे टाकत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थ जप्त केले आहेत. संबंधितांवर कठोर कारवाई सुरू असून, या मोहिमेमुळे विभागाची कार्यक्षमता पुन्हा चर्चेत आली आहे.
 
 
 Tukaram Mundhe
 
दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदलीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली होती. मात्र, या चर्चांवर अन्न व औषध प्रशासन मंत्री नागपुरातील१० पैकी ७ कोचिंग इमारती असुरक्षित यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. एफडीएकडून सध्या प्रभावी कारवाई सुरू असून, अशा परिस्थितीत मुंढे यांच्या बदलीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप करत मोठा दावा केला. ड्रग्ज लॉबी आणि काही मेडिकल कंपन्या एकत्र येऊन मुंढे यांच्या बदलीसाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले. एवढेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबीकडून तब्बल २५० कोटी रुपये गोळा करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाचा लवकरच नावानिशी खुलासा करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
 
दरम्यान, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विभागातील पायाभूत सुविधांच्या कमतरतेकडेही लक्ष वेधले. अनेक अधिकाऱ्यांकडे वाहनांची सुविधा नाही, काही ठिकाणी कार्यालयांचीही कमतरता आहे. या समस्या दूर करण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ अनेक नेतेही पुढे आले आहेत. सुधीर मुनगंटीवारयांनी मुंढे यांच्या कामाचे कौतुक करत, ते उत्कृष्ट काम करत असल्याचे म्हटले. त्यांना किमान तीन वर्षे या पदावर कायम ठेवले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच अर्जुन खोटकर यांनी मुंढे यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा करत, त्यांच्या जीवाला धोका असल्याने तातडीने सुरक्षा वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे राज्यातील ड्रग्ज आणि भेसळ माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.