स्वस्त अन्नधान्य वितरणास मुदतवाढ द्या

एनएसयुआयचे तहसीदारांना निवेदन

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
चामोर्शी
NSUI  मे व जून या कालावधीतील स्वस्त अन्नधान्य वितरण तसेच ई-पास मशीनद्वारे व्यवहार पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी एनएसयुआयच्या वतीने चामोर्शीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
 

NSUI Demands Extension for Free Ration Distribution in Chamorshi Till Month-End 
शासनाच्या निर्देशानुसार स्वस्त धान्य दुकानांमार्फत अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया सुरू असली तरी विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे अनेक लाभार्थींना अद्याप अन्नधान्य मिळालेले नाही. त्यामुळे कोणताही पात्र लाभार्थी आपल्या हक्काच्या अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी मे व जूनमधील अन्नधान्य वितरणाचे इ पास मशीनद्वारे व्यवहार पूर्ण करण्यासाठी चालू महिन्याच्या अखेरपर्यंत NSUI  मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. हे निवेदन नायब तहसीलदार नरोटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी एनएसयुआचे तालुका उपाध्यक्ष ओमप्रकाश चौधरी, संजय बुरांडे, कालिदास बुरांडे यांच्यासह एनएसयुआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.