ब्रिटिशकालीन ऐतिहासिक विहिरीचे जतन करा

नगर पालिकेला निवेदन

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
हिंगणघाट, 
historic-british-era-well : शहरातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक विहिरीची होत असलेली दुरवस्था लक्षात घेता तिचे जतन व संवर्धन करून रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी उपयोग करण्यात यावा, अशी मागणी निसर्गसाथी ऐतिहासिक समूहाच्या वतीने नपला करण्यात आली आहे.
 
 
jk
निवेदनात नमूद केल्यानुसार, ती विहीर शहराच्या इतिहासाची साक्ष देणारा महत्त्वाचा वारसा असून तिचे अस्तत्वि सध्या धोक्यात आले आहे. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे या ऐतिहासिक विहिरीचे जतन करून तिचा रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी संकलन) प्रकल्पासाठी उपयोग करा. तसेच ऐतिहासिक वारशाचेही संवर्धनही होईल. विहिरीला ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून माहिती फलक लावण्यात यावा आणि नियमित देखभाल व्यवस्था करण्यात यावी, विहिरीमध्ये कचरा टाकून नैसर्गिक जलस्त्रोतांचे नुकसान करबयांवर कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली.