बुलढाणा,
rain-floods : रुईखेड-मायंबा परिसरात २४ जून रोजी झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला रुईखेड येथील पुलाच्या कामासाठी टाकण्यात आलेले तात्पुरता मार्ग वाहून गेला. यामुळे भडगाव-चिखली मार्गावरील वाहतूक जवळपास चार ते पाच तास पूर्णपणे ठप्प झाली.

रुईखेड येथे पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहनांच्या वाहतुकीसाठी बाजूने तात्पुरता पर्यायी व्यवस्था म्हणून डायव्हर्शन उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, सततच्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढून आलेल्या पुरात हे डायव्हर्शन वाहून गेले. रस्ता बंद झाल्याने धाड मार्गावरून ये-जा करणार्या वाहनचालक व प्रवाशांची मोठी कसरत करावी लागली. अनेक प्रवाशांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली. विशेषतः महिलांना पूरग्रस्त भाग ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काहींना पुलाजवळील अँगलचा आधार घेत मार्गक्रमण करावे लागले. दरम्यान, अनेक वाहनांना परतीचा मार्ग स्वीकारत धाडमार्गे चिखलीकडे जावे लागले. उल्लेखनीय म्हणजे, या रस्त्याच्या सुधारणेसाठी शासनाने आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणार्या महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्प अंतर्गत सुमारे ३११ कोटी ६५ लाख रुपये काम वर्ष भरापासून सुरुआहे पुलाचे काम वेळेत पूर्ण होणे गरजेचे होते तसें न झाल्यामुळे रस्त्या च्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.