मॅटर्निटी ब्रेकवर जाणार समंथा

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
चेन्नई,
Samantha to go on maternity break साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूनेचाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अनेक दिवसांपासून तिच्या प्रेग्नन्सीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर अखेर तिने स्वतः शिक्कामोर्तब केले आहे. समंथा लवकरच आई होणार असून, या खास टप्प्यात ती अभिनय क्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याचे तिने जाहीर केले. अलीकडेच तिच्या नव्या चित्रपटाच्या यश सोहळ्यात माध्यमांशी संवाद साधताना समंथाने ही माहिती दिली. आपल्या आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी काही काळ कामापासून दूर राहणे आवश्यक असल्याचे सांगत तिने मॅटर्निटी ब्रेक घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, योग्य वेळ आल्यावर नव्या प्रोजेक्टसह पुन्हा चाहत्यांसमोर येण्याचे आश्वासनही तिने दिले.
 
 
 
samatha
गेल्या काही दिवसांपासून समंथाच्या काही फोटो आणि व्हिडिओंवरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले होते. विशेषतः तिच्या सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितीनंतर चाहत्यांमध्ये ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता समंथाने स्वतःच ही बातमी जाहीर केल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, समंथा सध्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असून तिची आणि तिचे पती राज निदिमोरू यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. डिसेंबर २०२६ मध्ये बाळाचा जन्म होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समंथासाठी हा काळ अत्यंत खास मानला जात आहे, कारण आई होण्याचे तिचे स्वप्न आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.