सावरडोह खडक नदी वरील निर्माण आधीन पूल गेला वाहून

सात गावाचा तुटला संपर्क

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
कारंजा (घा.), 
savardoh-khadak-river : यावर्षी पावसाला उशिर झाला. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना पावसाची आस होती. दोन दिवसांपासुन जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, तालुक्यातील सावरडाेह येथे नव्याने पुलाचे बांधकाम सुरू झाले. त्यामुळे पुलाच्या बाजूला तात्पुरता पूल तयार करण्यात आला होता. काल २४ रोजी झालेल्या पावसाने नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने तात्पुरता तयार करण्यात आलेला पुलही वाहून गेला. त्यामुळे परिसरातील ७ गावांचा संपर्क तुटला आहे. हा पूल दुरुस्त करण्यासाठी ३ ते ४ दिवस लागतील, असे सांगण्यात आले.
 

hj 
 
सावरडोह नदीच्या पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यामध्ये आजूबाजूच्या गावातील नागरिकांना येण्या-जाण्याकरिता त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या पुलाची उंची वाढवण्याची मागणी अनेक वर्षापासुन करण्यात येत होती. एक वर्षापूर्वीच सावरडोह नदीवरील पुलाचे भूमिपूजन झाले झाले. कारंजा ते साहूर मार्गाला जोडलेला आहे. कारंजा हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे शिक्षणासाठी माणिकवाडा, सुसुंद्रा, बेलगाव,सावरडोह व खापरी येथील विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता येतात. त्याचप्रमाणे नारा, सावरडोह, सुसुंद्रा व बेलगाव येथील शेतकरी सुद्धा याच ठिकाणी येणे-जाणे करतात. सावरडोह येथील खडक नदीच्या पूल कमी उंचीचा असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या नदीच्या पुलावरून सहा ते सात फूट पाणी सतत वाहत राहत होते. त्यामुळे विद्याथीर्, शेतकऱ्यांना पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तासंतास थांबावे लागत होते. रुग्णाला साहूर किंवा आष्टी येथे न्यावे लागत होते. या.पुलासाठी मोठमोठे आंदोलन झाली आणि तीन महिन्यापासून या पुलाचे बांधकाम सुरू झाले. मात्र, हा पूल लवकर न झाल्यामुळे अखेर निर्माणाधीन पर्यायी व्यवस्था केलेला पूल नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वाहून गेला. त्यामुळे सवरडोह, बेलगाव,सुसुंद्रा, माणिकवाडा, खापरी हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झालेली आहे. पर्याय व्यवस्था करायला दोन ते तीन दिवस लागण्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.