“देशात लोकशाही संपुष्टात आली आहे का?

खासदार फुटीवर सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल

    दिनांक :25-Jun-2026
Total Views |
मुंबई
Supriya Sule statement महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (ठाकरे गट)च्या सहा खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत देशातील लोकशाहीच्या स्थितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
 
 

Supriya Sule statement, 
फुटलेल्या खासदारांपैकी काही जणांना भाजपमध्ये प्रवेश करायचा होता, तर एक खासदार शिवसेना (शिंदे गट)मध्ये जाण्यास तयार नव्हता. सुप्रिया सुळे यांनी आपले मत दर्शवले. प्रतिक्रिया देताना त्यांनी, “या देशात लोकशाही संपुष्टात आली आहे का, असा प्रश्न पडतो. घरं फोडली जात आहेत, पक्ष फोडले जात आहेत. लोकप्रतिनिधी निवडून येऊन अवघी दोन-अडीच वर्षे झाली आहेत. 2029 मध्ये निवडणुका होणार आहेत, मग इतकी घाई कशाची?” असा सवाल उपस्थित केला.
सुळे यांनी यावेळी विरोधी पक्षांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. “एखाद्या चांगल्या विधेयकासाठी किंवा देशहिताच्या निर्णयासाठी विरोधी पक्षाने सरकारला पाठिंबा देणे वेगळे आणि पक्ष फोडणे वेगळे आहे. जीएसटी विधेयकाच्या वेळी काँग्रेससह आम्ही भाजपला सहकार्य केले होते. त्यासाठी पक्षांमध्ये फूट पाडण्याची गरज नव्हती. जर सर्वच पक्ष सत्तेत गेले तर जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणार कोण?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 
 
महाविकास आघाडीच्या बैठकीला काही आमदार अनुपस्थित राहिल्याच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना संबंधित आमदारांनी पूर्वकल्पना दिली होती, असे सांगत अधिक माहितीसाठी पक्ष नेतृत्वाशी संपर्क साधण्याचा सल्ला त्यांनी दिला.दरम्यान, शालेय अभ्यासक्रमात आणीबाणीचा धडा समाविष्ट करण्याच्या निर्णयावरही सुप्रिया सुळे यांनी टीका केली. सरकारकडून सातत्याने एनसीईआरटीचा गैरवापर होत असल्याचा आरोप शिक्षणतज्ज्ञ करत असल्याचे नमूद करत त्यांनी, “पुढील पिढीवर विशिष्ट विचारधारा लादण्याचा प्रयत्न होत आहे. हे देशाच्या ऐक्यासाठी आणि नव्या पिढीच्या स्वतंत्र विचारक्षमतेसाठी घातक ठरू शकते,” असे मत व्यक्त केले.
महाविकास आघाडीच्या Supriya Sule statement  एकजुटीबाबत बोलताना सुळे यांनी दिल्लीतील इंडिया आघाडीचे उदाहरण दिले. संसद अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांमध्ये नियमित समन्वय होत असल्याचे सांगत त्यांनी आघाडी मजबूत असल्याचा दावा केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यालयात दररोज बैठका होत असून दिवसभराच्या रणनीतीवर चर्चा केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.सहकार क्षेत्रातील निवडणुकांबाबतही त्यांनी भूमिका मांडली. सहकारी संस्थांमध्ये पक्षीय राजकारण आणू नये, ही राष्ट्रवादीची सातत्यपूर्ण भूमिका असल्याचे सांगत विविध पक्षांचे प्रतिनिधित्व असलेल्या सहकारी बँकांचे उदाहरण त्यांनी दिले.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे खासदार किंवा आमदार फुटणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी फेटाळून लावले. अशा दाव्यांवर टीका करताना त्यांनी, “आमचे कोणते खासदार फुटणार आहेत, त्यांची नावे जाहीर करावीत. पाच जणांची नावे सांगितली जात असतील तर ती स्पष्ट करावीत. आम्हालाही बोलवा, आम्ही सर्वजण उपस्थित राहू,” असा टोला लगावला.शिवसेनेतील खासदार फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होत असताना सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.