मुंबई,
Vaibhav will not make his debut भारत आणि आयर्लंड यांच्यात 26 जूनपासून दोन सामन्यांची टी-20 मालिका रंगणार असून, या मालिकेकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला पदार्पणाची संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारताच्या संघात वैभव सूर्यवंशीचा समावेश झाल्यानंतर त्याच्या डेब्यूबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक क्रिकेट तज्ज्ञ आपापली मते मांडत असताना, प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनीही संभाव्य प्लेइंग इलेव्हनबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे. हर्षा भोगले यांच्या मते, सलामीच्या जोडीमध्ये सध्या कोणताही बदल करण्याची गरज नाही. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी भारतासाठी योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकत्याच मोठ्या स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या या जोडीवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत त्यांना बाहेर ठेवून वैभवला लगेच संधी देणे योग्य ठरणार नाही, असे मत त्यांनी मांडले. मधल्या फळीत ईशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांच्यावर जबाबदारी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच अष्टपैलू विभागात अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गोलंदाजी विभागात वेगवान माऱ्यासाठी Harshit हर्षित राणा, प्रसिध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळू शकते. त्यामुळे हर्षा भोगलेंच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनमध्ये वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालेले नाही. दरम्यान, आयर्लंड दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. संघात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, तिलक वर्मा, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंगआणि प्रिन्स यादव यांचा समावेश आहे.