रिसोड,
Wild Boar Attack in Hingoli शेतात हळद लावण्यासाठी गेलेल्या महिलांवर रानडुकराने अचानक हल्ला केल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याची २५ जून रोजी सकाळी ११ वाजता हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वाघजाळी शिवारात घडली.
हनीफा बी फिरोज खान पठाण वय ३२ रा. वाघजाळी असे जखमी महिलेचे नाव असून, तिला प्रथम रिसोड येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल केल्यानंतर प्राथमिक उपचारानंतर महिलेची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हनीफा बी फिरोज खा पठाण ही महिला अन्य महिलासोबत हळद लावण्याकरिता वाघजाळी शेत शिवारात गेली असता हळद लावण्याचे कामा दरम्यान सर्व महिला ह्या जेवणाकरिता बसल्या असता हनीफा बी या महिलेला मोहर्रम चा Wild Boar Attack in Hingoli रोजा (उपवास) असल्याकारणाने ती बाजूला बसली होती. या दरम्यान रानडुकराने अचानक या ठिकाणी हल्ला केला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी महिलेला उपचारासाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.