युवा सेनेची कार्यकारणी बरखास्त
अमरावती जिल्हा आढावा बैठक
अमरावती,
Amravati Shiv Sena शिवसनेची अमरावती जिल्हा पदाधिकारी बैठक शुक्रवारी हाॅटेल गाैरी इनमध्ये आयाेजिण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा शिवसेनेत लवकरच म्हणजे ३० दिवसांच्या आत खांदेपालट करण्याचे संकेत देण्यात आले. युवा सेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. उद्योग मंत्री उदय सामंत, अमरावती जिल्हा संपर्कप्रमुख आमदार किशोर आप्पा पाटील, उपनेत्या प्रीती बंड, आमदार बच्चू कडू, संजना गवळी, पराग पिंगळे, श्याम देशमुख, जिल्हाप्रमुख संतोष बद्रे, आशिष धर्माळे, सुनील डिके, प्रमोदसिंग गड्रेल यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते.
शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले, अमरावतीच्या चारही जिल्हाप्रमुखांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे नव्याने नियुक्त्यांची प्रक्रिया करावी लागणार आहे. बुथ प्रमुख नेमले जाणार आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे निर्देश पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यानुसार येत्या ३० दिवसांत हे काम पूर्ण करायचे आहे. त्यासाठी जिल्हा संपर्कप्रमुख आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार बच्चू कडू यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. ते त्यांचे काम नियोजित वेळेत पूर्ण करतील. शिवसेनेचे संघटन आपल्याला बळकट करायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याचवेळी त्यांनी युवा सेनेची संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करण्याची घोषणा केली. या कार्यकारणीची नव्याने रचना होणार आहे. प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने हजर हाेते.