विमा कर्मचारी असोसिएशनचा ७५ वर्षांचा गौरव सोहळा

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
नागपूर,
insurance employees association अखिल भारतीय विमा कर्मचारी असोसिएशनच्या स्थापनेच्या ७५ वर्षानिमित्त नागपूर डिव्हिजनल एलआयसी एम्प्लॉईज युनियनतर्फे मोहननगर येथील सहकार जीवन सभागृहात प्लॅटिनम जुबली महोत्सवी संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मराज महापात्रा यांनी एलआयसी ही देशाच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेचा आधारस्तंभ असून संघटनेने गेल्या ७५ वर्षांपासून देशहित, उद्योगहित आणि कामगारहित जपत संघर्षाची परंपरा कायम राखल्याचे सांगितले. कार्यक्रमात विविध कामगार नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच संघटनेसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार करण्यात आला. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शिवा निमजे होते. कार्यक्रमाला विमा कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, अशी माहिती नरेश अडचुले यांनी दिली.
 
 
insurance employees association
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र