८ लाखाच्या एमडी ड्रग्ससह आरोपी ताब्यात

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
शहर गुन्हे शाखेची कारवाई
 
अमरावती, 
Accused detained with MD drugs अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ चे अधिकारी व अंमलदार यांना रेकॉर्डवरील एक गुन्हेगार हबीब नगरातील त्याच्या राहत्या घरात मॅफेड्रान (एम.डी.) नावाचा अंमलीपदार्थ बाळगून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीवरून २६ जून रोजी गुन्हेशाखेच्या पथकाने नागपुरी गेट पोलिस ठाणे हद्दीतील हबीब नगर, नं. १ येथे अब्दुल इजाज उर्फ इजाज चन्द्रपूर याच्या राहत्या घरी छापेमारी केली असता घरझडतीमध्ये ५४.२ ग्रॅम मॅफेड्रान आढळले. हा अंमली पदार्थ विक्रीकरीता जवळ असल्याची कबुली दिल्याने आरोपीला ८ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या मॅफेड्रान ड्रग्ससह ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरोधात नागपुरी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
drugs
 
ही कारवाई पोलिस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त यशवंत सोळंके, उपायुक्त रमेश धुमाळ, गुन्हे शाखा सहायक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे, गाडगेनगर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त कैलाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे, पोलिस निरीक्षक अतुल वर, सहाय्यक निरीक्षक मनीष वाकोडे, सहाय्यक निरीक्षक दशरथ आडे, सहाय्यक निरीक्षक महेश इंगोले, उप निरीक्षक गजानन सोनुने, सहाय्यक उप निरीक्षक फिरोज खान, कर्मचारी सतीश देशमुख, मंगेश लोखंडे, नाझीमउददीन सैयद, सचिन भोयर, रंजित गावंडे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, सागर ठाकरे, नरेश मोहरील, वर्षा घोंगडे, चेतन शर्मा, सुधीर गुडधे यांनी केली.