वर्धा,
amateur kabaddi federation भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या (अमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया एकेएफआय)च्या अध्यक्षपदी माजी खासदार रामदास तडस यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत देशभरातील विविध राज्यांतील प्रतिनिधींना संधी देण्यात आली असून ४१ पदाधिकार्यांची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या २०२६ ते २०३० या कालावधीसाठीची निवडणूक रांची (झारखंड) याठिकाणी रविवार २१ जून रोजी पार पडली. या निवडणुकीसाठी महासंघाचे २२ राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. विदर्भातील कबड्डी असो. विदर्भ संघ नागपूरचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांची अध्यक्ष निवड झाली. महाराष्ट्राचे क्रीडा प्रशासक म्हणून उद्योगपती पुनीत बालन यांची निवड करण्यात आली आहे. बिहारचे राजकुमार सिंह यांची मुख्य संरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी तेलंगणाच्या उशी रेड्डी, कबड्डी असो. विदर्भ संघ नागपूरचे सचिव प्रदिपसिंह ठाकूर यांची निवड झाली. देशातील विविध राज्यांतील ४१ प्रतिनिधींची बिनविरोध निवड करण्यात आली.
विदर्भातील कबड्डी असो. विदर्भ संघ नागपूरचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांची अध्यक्षपदी तसेच विदर्भ संघ नागपूरचे सचिव प्रदिपसिंह ठाकूर यांची सहसरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल कबड्डी असो. विदर्भ संघ नागपूरचे कार्यकारी अध्यक्ष सुधीर जामुनकर तसेच अभय शिंगाडे, शिरीष काळे, सतिश इखार, विजय बोदोडे, गणेश चौकसे, गिरीष गाडगे, वसंता देवटकले, विजय येनुरकर, परेश देशमुख नागपूर, धर्मराम आत्राम, ऋषिकेश पापडकर, शत्रुघ्न विडकर, सुभाष तायडे, विश्वास रायबोले, देविदास जंजाळ अकोला, आदींसह सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या.