जिव्हाळातर्फे अवयवदान जनजागृतीचा उपक्रम

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
नागपूर,
organ donation जिव्हाळा ज्येष्ठ महिला मंडळ, श्रीनगर (नरेंद्र नगर), नागपूर यांच्या वतीने सुयोगनगर येथील महात्मा ज्योतिबा फुले उद्यानातील विरंगुळा केंद्रामध्ये नुकतेच नेत्रदान, देहदान व अवयवदान या विषयावर माहितीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख व्याख्यात्या मोहन फाउंडेशनच्या वीणा वाठोरे यांचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
 
organ donation
 
प्रमुख व्याख्यात्या वीणा वाठोरे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीत श्रोत्यांना नेत्रदान, देहदान व अवयवदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे काही निवडक प्रसंग आणि छोट्या कथांद्वारे अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच या विषयासंदर्भातील समाजातील अनेक गैरसमज आणि समजुतींचा उलगडा करत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी व्यासपीठावर मंडळाच्या अध्यक्षा माधवी रागिणवार तसेच कुंजलता पालेवार, शैलजा बेलोरकर आणि मंजिरी शास्त्री या पदाधिकारी उपस्थित होत्या.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गव्हाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंजिरी शास्त्री यांनी केले. या कार्यक्रमाला मंडळाच्या सदस्य डॉ. रश्मी गेडाम, दीपा रोंगे, उर्मिला काटोले, लता गुगल, प्रेमा सावरकर, नीलिमा वरवंटीवार, अश्विनी गुणगे तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: सुनील गव्हाणे, संपर्क मित्र