डायल ११२ मुळे मिळाली एक लाख तीस हजार रुपयाची बॅग

मालेगाव पोलिसांची तत्परता

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
मालेगाव,
dial 112 मालेगाव पोलिस ठाण्याच्या डायल ११२ पथकाच्या तत्परता, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेमुळे समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावर विसरलेली एक लाख तीस हजार रुपयाची रोख रक्कम असलेली बॅग त्या मालकाला सुखरूप परत मिळाली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार २४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता डायल ११२ वर सीएफएस क्रमांक ३७६२९७५० प्राप्त झाला. यामध्ये कॉलरने समृद्धी महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर आपली बॅग विसरल्याची माहिती दिली. बॅगेत मोठी रक्कम असल्याचेही त्यांनी सांगितले. सदर माहिती मिळताच डायल ११२ वाहनावरील पोलिस हवालदार सुखनंदन तांबारे यांनी पोलिस निरीक्षक राजेश खेरडे यांना याबाबत अवगत केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलर मनोज जगदीश मुजुमदार रा. नेवासा, जिल्हा अहमदनगर यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेण्यात आली. त्यांनी समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावर बॅग विसरल्याचे सांगितले.
 

dial 112 
 
 
त्यानंतर पोलिस हवालदार सुखनंदन तांबारे व चालक पोकॉ पवन भालेराव यांनी तत्काळ समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक २३१ जवळील पेट्रोल पंप गाठला. तेथे शोध घेतला असता संबंधित बॅग मिळून आली. बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. कॉलरशी पुन्हा संपर्क साधला असता त्यांनी २० हजार रुपये वाहनाच्या डिकीत असल्याचे सांगितले व बॅगेतील रक्कम एक लाख तीस हजार रुपये असल्याची खात्री दिली. त्यानुसार पोलिसांनी सदर रक्कम सुरक्षित ठेवली.
२६ जून मनोज मुजुमदार हे मालेगाव पोलिस ठाण्यात हजर झाले. आवश्यक पडताळणी पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांची बॅग व एक लाख तीस हजार रुपयांची रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली.dial 112 हरवलेली मोठी रक्कम सुरक्षितपणे परत मिळाल्याने मनोज मुजुमदार यांनी मालेगाव पोलिसांचे आभार मानले. तसेच डायल ११२ पथकाच्या तत्परता, प्रामाणिकपणा व जनसेवेच्या भावनेचे कौतुक केले.