बीजिंग हादरलं! १०९ मजली टॉवरला विमानाची धडक VIDEO

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
बीजिंग,
beijing shaken चीनची राजधानी बीजिंगमध्ये शुक्रवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. एका लहान विमानाने शहरातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेल्या १०९ मजली सिटिक टॉवरला धडक दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यात इमारतीवर धडक बसल्यानंतर ढिगाऱ्याचे तुकडे खाली कोसळताना दिसत आहेत.
 
beijing shaken
 
अपघातानंतर इमारतीच्या परिसरात घबराट पसरली. धडकेनंतर काही भागातील अवशेष खाली पडले आणि परिसरात आग लागल्याचीही माहिती समोर आली. खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीतील नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका त्वरित दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
 सौजन्य: सोशल मीडिया
 
 
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित विमान हे हलक्या प्रकारातील स्पोर्ट्स विमान होते. उड्डाणादरम्यान विमान नियोजित मार्गापासून भरकटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही ऑनलाइन उड्डाण नोंदींनुसार, विमानाचा मार्ग अचानक बदलल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
 
या घटनेनंतर बीजिंगमधील हवाई सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने परिसर सील करून तपास यंत्रणांना चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातात नेमकी किती जीवितहानी झाली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण बीजिंग शहर हादरले आहे.