अभिनेत्रीच्या फ्लॅटमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
बंगळूर,
Body found in actress's flat कृषी थापंडा सध्या एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आल्या आहेत. बंगळूर मधील आरआर नगर परिसरात असलेल्या त्यांच्या राहत्या घरात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच चर्चा रंगली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मृत व्यक्तीची ओळख वैशाख उपाध्याय अशी पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पश्चात पत्नी आणि १४ वर्षांचा मुलगा आहे. वैशाख यांचा मृतदेह अभिनेत्रीच्या घरात नेमका कसा सापडला आणि या घटनेमागचे कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
 
 

कृषी थापंडा 
 
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी, २४ जून रोजी उघडकीस आली. रात्री उशिरा बंगारप्पा गुड्डा परिसरातील एलिगेंट टेरेस अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये वैशाख यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच आरआर नगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला.तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, वैशाख यांच्या वैवाहिक आयुष्यात काही काळापासून गंभीर तणाव सुरू होता. वैयक्तिक आयुष्यातील वाद आणि अस्थिरता यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे बोलले जात आहे. बिझनेसमन एव्हीआर रेड्डी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर वैशाख आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद वाढल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
याच वैवाहिक तणावामुळे वैशाख अनेकदा कृषी थापंडा यांच्या घरी जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. बुधवारी, २४ जून रोजीही ते अभिनेत्रीच्या घरी गेले होते. यापूर्वी एका व्यावसायिकाला धमकी दिल्याच्या प्रकरणात वैशाख यांना अटकही करण्यात आली होती. या संदर्भात एचएएल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा कृषी थापंडा घरी उपस्थित नव्हत्या. त्या मेहादेवपुरा येथील क्षेमवनममध्ये आयोजित मेडिटेशन कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यामुळे घटनेच्या वेळी त्या घराबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस सर्व शक्य बाजूंनी तपास करत असून या प्रकरणामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.