नवी दिल्ली
bavana shooting दक्षिण दिल्लीतील संगम विहार परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. किरकोळ वाटणाऱ्या वादातून एका ३० वर्षीय महिलेची तिच्या पतीनेच गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती समोर आली असून, घटनेनंतर आरोपी पती फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीचे नाव शुभम राजपूत असे आहे. त्याने आपली पत्नी कविता हिच्यावर अंदाजे चार गोळ्या झाडून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान घटनास्थळावरून निकामी काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, पोलिस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, कविता आणि शुभम राजपूत यांचा विवाह सुमारे दोन वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, विवाहानंतर त्यांच्या नात्यात सातत्याने वाद निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुभम हा पत्नीला वारंवार धमक्या देत असल्याचे तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.मृत कविताच्या नातेवाईकांनीही गंभीर आरोप केले असून शुभमचे एका अन्य महिलेसोबत संबंध असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार bavana shooting वाद होत असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासातही आरोपीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, या सर्व आरोपांची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.या प्रकरणात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. आरोपी फरार असून त्याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. घटनेमागील नेमका घटनाक्रम आणि कारणांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान, दिल्लीतच घडलेल्या आणखी एका घटनेनेही खळबळ उडाली आहे. उत्तर दिल्लीतील बवाना परिसरातील पूठ खुर्द गावात गुरुवारी रात्री गोळीबारात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना रात्री साडेआठ वाजता गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी बाळकृष्ण नावाचा तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले. जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.