समुद्रपूर,
Emergency Day गिरड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने संविधान हत्या दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आणीबाणीचा अनुभव घेतलेले ज्येष्ठ नागरिक मोहन गिरडे, ईश्वर निस्ताने, महादेव चामचोर, प्रल्हाद पोयाम यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुभाष कुंटेवार म्हणाले, की, ज्या वर्षी आणीबाणी लागली, त्या वर्षी आपले वय २० वर्षे होते.
आणीबाणी जाहीर झाली, त्या दिवशी मित्रांसोबत हिंगणघाट शहरातील श्रीराम टाकीमध्ये सिनेमा बघत होतो. मात्र हा सिनेमा अध्र्याच थांबविण्यात आला. त्यावेळी आम्हाला काहीच समजल नाही. आणीबाणीच्या काळात खरच सर्व सामान्य लोकांवर अन्याय झाला हे मी नाही तर त्या काळातील सर्व लोकांचे अनुभव असल्याचे कुंटेवार म्हणाले. कार्यक्रमाला गिरड ग्रामपंचायतीचे प्रशासक राजू नौकरकर, मोहगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे, मोहन गिरडे, फकिरा खडसे, अरुण मोटघरे, नूतन गिरडे, मारोती गुंड्डे, विठ्ठल पिंजरकर, विजया तेलरांधे, मनीषा भांदककर, विनोद भोयर आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संचालन विनोद येणुरकर, प्रास्ताविक बहादूरसिंह अकाली तर आभार प्रशांत ठाकूर यांनी मानले.